Saturday, February 16, 2013

वरात निघाली दुबईला


This article is published in February month issue of  'YUVA' magazine of Rane Publication 


वरात निघाली दुबईला

आपल्या लिखाणाने आणि नाटकांनी रसिकांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजवणारे साहित्यिक, संगितकार, अभिनेते, विज्ञानप्रेमी असे बहुरूपी व्यक्तीमहत्त्व म्हणजे पु.ल.देशपांडे. पु.लं.नी लिहिलेले 'वा-यावरची वरात' हे नाटक नव्या कलाकारांसोबत निघालेय दुबईवारीला... 



प्रतिक मुकणे (Email Id: info@pratikmukane.com)
आपल्या लिखाणाने आणि नाटकांनी रसिकांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजवणारे साहित्यिक, संगितकार, अभिनेते, विज्ञानप्रेमी असे बहुरूपी व्यक्तीमहत्त्व पु.ल.देशपांडे यांनी लिहिलेले वा-यावरची वरात हे पुन्हा रचलेले नाटक नव्या कलाकारांसोबत दुबईवारीला निघाले आहे.

'वा-यावरची वरात' या नाटकाचा पहिला प्रयोग 16 सप्टेंबर 1962 साली मुंबईत झाला होता. मात्र, पु.ल.देशपांडे यांच्या एकाही नाटकाची निर्मिती नाट्यसंपदाने गेल्या 50 वर्षात  केली नव्हती, त्यामुळे निर्माते अनंत पळशीकर यांनी श्रीकांत मोघे यांच्या मार्गदर्शनाखाली, नव्या कलाकारांसोबत हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आणले. 

पु.ल.देशपांडे यांनी आपल्या नाटकाचे लेखन, संगीत आणि दिग्दर्शन स्वतःच केले होते. त्यांनी केलेल्या नाटकांच्या सीडी बाजारात उपलब्ध होत्या. त्यामुळे त्याच सीडींच्या आधारे 2010 साली नव्या कलाकारांसोबत 'वा-यावरची वरात' या नाटकाची पुन्हा रचना करता आली असल्याचे  करण्यात आली असल्याचे नाटकाचे निर्माते अनंत पणशीकर यांनी सांगितले. 

श्रीकांत मोघे यांनी अनेक प्रयोग पु.ल.यांच्यासोबत केले होते. त्यामुळे या नाटकाच्यापुन्हा रचण्यासाठी त्यांना बोलविण्यात आले. या नाटकात एकूण 16 कलाकारांचा सहभाग असून प्रत्येक गोष्ट ही पूर्वी प्रमाणेच लाईव्ह सादर करण्यात येत आहे. विशेष  म्हणजे, 50 वर्षांपूर्वीचा संदर्भ, आजच्या घडीला देखील तितकाच साजेसा आहे.   

मराठी भाषिक आणि मराठी कलेची आवड असणारे हजारो नागरिक परदेशात आहेत. त्यामुळे मराठी नाटकांचा निखळ आनंद घेण्यासाठी परदेशी मराठी बांधव सुट्यांमध्ये भारतात येतात. महाराष्ट्र मंडळ दुबईचे कोशाध्यक्ष निरंजन वैद्य हे देखील मुंबईला आले होते. त्या दरम्यान त्यांनी 'वा-यावरची वरात' हे नाटक पाहिले व त्यांना ते इतके आवडले की, हे नाटक दुबईमध्ये व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. वैद्य यांनी त्यासाठी आनंद इंगळें यांच्याशी व महाराष्ट्र मंडळ दुबईचे अध्यक्ष प्रकाश केळकर यांनी आनंत पणशीकर यांच्याशी संवाद साधला व हे नाटक दुबईमध्ये करण्याचे ठरवले. परंतु एवढ्या कलाकारांना एकाचवेळी दुबईला घेऊन जाण्यासाठी प्रायोजनाची अवश्याकता होती. आर्थिक अडचणींमुळे एवढ्या कलाकारांना एकाचवेळी दुबईला घेऊन जाणे शक्य होणार नव्हते. मात्र, जेव्हा ही बाब युवाचे संपादक नितेश राणे यांना कळाली, तेव्हा त्यांनी पुढकार घेऊन ‘युवा’ तर्फे प्रयोगासाठी दुबईला जाण्यासाठी लागणारा  प्रायोजन प्रवास खर्च देण्याचे ठरवले. त्यामुळे येत्या 22 फेब्रुवारीला 'वा-यावरची वरात' या नाटकाचा ७५ वा प्रयोग दुबईमध्ये साकार होणार आहे. विषेश म्हणजे, एखाद्या नाटकाच्या  प्रयोगासाठी 16 कलाकारांनी परदेशात  जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.     

नव्या कलाकारांच्या या नाटकात आनंद इंगळे हे पु.ल.देशपांडे यांची भूमिका साकारत आहेत. तर प्रदीप पटवर्धन हे रमाकांत देशपांडेंची, अतिषा नाईक या आशालता वाभगावकर यांची तर लालजी देसाई यांनी साकारलेली भूमिका अमोल बावडेकर बजावत आहे. त्याच बरोबर विघ्नेष जोशी, सुप्रिया पाठारे, श्रध्दा केतकर, समीर चैघूले, नयना आपटे, अपर्णा अपराजित, रमेश  वाणी, सुहास चितळे, प्रणव राणे, अमित जांभेकर यांचा देखील या नाटकात समावेश आहे. पु.ल देशपांडे यांनी लिहिलेल्या नाटकात काम करण्याची संधी मिळणे हे आपले भाग्यच असल्याचे मत नाटकात सहभागी झालेल्या कलाकारांनी व्यक्त केले आहे.   
'वा-यावारची वरात' हे नाटक 50 वर्षांचे झाले आहे. मात्र, आजही पु.ल.देषपांडे यांच्या विनोदांची आणि नाटकांची जादू तितकिच असल्याचे मत नाटकाचे मार्गदर्शक श्रीकांत मोघे यांनी व्यक्त केले.  मोघे यांनी पु.ल.देशपांडे यांच्यासोबत काम केल्यामुळे, नाटकाच्या सर्व बाबींशी ते एकरूप आहेते. पु.ल यांची भूमिका योग्य प्रकारे साकरणरा व नाटकाला न्याय देणारे कलाकार निवडणे ही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बाब होती. या नाटकाचे देशभरात आजपर्यंत झालेले प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल होते. पण पु.ल.यांचे हे नाटक आता साता समुद्रापलिकडे होणार असून त्यांच्या चाहत्यांसाठी ही एक मेजवाणीज ठरणार असल्याचे मोघे म्हणाले. मराठी भाषा आणि कला जेवढी समृध्द आहे, तेवढी इतर कोणतीच भाषा समृध्द नाही. परंतु ती लोकांसमोर आणण्यात आपण कमी पडत आहोत. मात्र, मराठी नाटकांचा झेंडा परदेशात रोवण्यासाठी नितेश राणे यांनी उचललेले पाऊल आणि ‘युवा’ने केलेले सहकार्य ही खूपच मोलाची बाब असल्याचेही ते म्हणाले.

पु.ल.देशपांडे यांची भूमिका साकारत असलेले आनंद इंगळे यांनी आपल्यासाठी ही पर्वणीच असल्याचे सांगितले. पु.ल.यांची भूमिका उत्कृष्ट प्रकारे साकारतायावी यासाठी त्यांनी केलेल्या प्रयोगांच्या सीडी वारंवार बघून त्याचा अभ्यास केला असल्याचे इंगळे म्हणाले. महाराष्ट्र मंडळ दुबई, कलानिधी आणि नाटयसंपदाचे अध्यक्ष आनंद पळशीकर यांच्यामुळे आम्हाला हे नाटक आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्याची संधी मिळत असून त्यांनी दाखवलेले धाडस हे कौतुकासपद असल्याचेही इंगळे म्हणाले. 

तर प्रदीप पटवर्धन हे रमाकांत देशपांडे यांनी साकरलेली भूमिका साकारत आहेत. पु.लं. यांनी लिहिलेल्या नाटकात आपल्याला काम करायला मिळणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे. या नाटकामुळे केवळ चांगले नाटक करण्याची संधी मिळत नसून खूप काही शिकायला देखील मिळत आसल्याचे पटवर्धन यांनी सांगितले. या नाटकासाठी संपूर्ण टीम मेहनत घेत असून, श्रीकांत मोघे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभात आहे. सुरूवातीला या नाटकाचे 3-4 प्रयोगच होणार होते. मात्र, पणशीकर यांनी ते सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला व त्यामुळे आता या नाटकाचा 75वा प्रयोग साता समुद्रापलिकडे होणार आहे. त्यानिमित्ताने आम्हा कलाकारांना परदेशातील मराठी बांधवांना देखील भेटण्याची संधी मिळेल. दुबई प्रमाणचे महाराष्ट्र मंडळ हे इतर देशांमध्ये देखील आहेत. त्यामुळे हे नाटक जगभरातील पु.ल.देशपांडेंच्या चाहत्यांना बघण्यास मिळाले, तर तो केवळ आमचाच नाही, तर पु.लं.यांचा देखील गौरव असेल. 

वा-यावरची वरात या नाटकाचा 75 वा प्रयोग व नाट्यसंपदाला होत असलेली 50 वर्षे, यामुळे दुबईमधील पु.ल.देशपांडे यांच्या चाहत्यांना आणि मराठी बांधवांना विनोदांचा अस्वात तर घेता येणारच आहे, पण त्याच बरोबर नाट्य श्रुष्टीतील दिग्गज कलाकारांना देखील भेटण्याची संधी मिळणार आहे. 

No comments:

Post a Comment